Nashik Engineer GymkhanaNashik Engineer Gymkhana
सालाबादाप्रमाणे इंजिनिअर्स जिमखाना आयोजित वर्षा सहल यंदा भंडारदरा-- इको सिटी --कोकण कडा येथे प्रस्तावित आहे. 20 आॅगस्ट 2022 रोजी सहल जाणार निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभलेल्या या परिसरातील भटकंती हमखास ‘हटके’ आहे. पावसाळ्यात एका दिवसासाठी कामाचा शिणवटा घालवावा, असे वाटत असेल तर बिनधास्तपणे सहलीला या. पावसामुळे प्रफुल्लित झालेला निसर्ग अनुभवण्याची संधी हा परिसर पर्यटकांना देतो. याशिवाय धबधब्याच्या पाण्याखाली भिजण्याची  व गरमागरम कांदा भजी आणि त्यावर चहाची लज्जत सोबतीला आहेच. भंडारदरा-- कोकणकडा बघण्याची ही नामी संधी चुकवू नये व  बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. *इच्छुक सभासदांनी आपली नावे आवश्य द्यावी .   आपण ही मज्जा लुटू शकता आमच्या सोबत... भंडारदरा /घाटघरच्या निसर्गरम्य वातावरणात... १)अगदी नाममात्र शुल्कात... रु. 750/- फक्त (दुपारच्या जेवणासह) २) 5 वर्षा खालील बालकांना निशुल्क प्रवेश 3) 5 वर्ष ते 16 वर्ष वयो गटातील मुल/मुलींना रु 500/- नाम मात्र शुल्क आकरण्यात येईल 4) जादा येणारा खर्च जिमखाना निधीतुन करण्यात येईल 5) कृपया आपली प्रवेश फी दि 17/8/2022 पर्यत जमा करावी म्हणजे पुढील नियोजन करणे सोईचे होईल संपर्क:- रूही आहेर स अ 2 सिचंन भवन, मुख्य अभियंता,उमप्र,नाशिक मग तयार आहात ना... नासिक इंजिनिअर्स जिमखाना मनसोक्त भटकंती...

Yoga Activities

ताडासन

Nashik Engineers Gymkhana

ताडासन


ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे. ताडासन करण्याची पद्धत: ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहावे. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे. सावधगिरी : हात डोक्याच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचे वजन हे पायाच्या बोटांवर असते. जेव्हा हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र पोट हे आतल्या बाजूला घेतले पाहिजे. ताडासनाचे फायदा : ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. शक्तिमध्ये वाढ होऊन मुळव्याधी असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Enroll with this course now

भुजंगासन

Nashik Engineers Gymkhana

भुजंगासन

या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले. आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावे.
आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे. हे आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकता. सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते, आणि आपण सुडौल दिसायला लागता. ही काळजी आवश्यक घ्या:
हे आसन करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे मागे झुकण्याचा प्रयत्न मुळीच करू नाक, अन्यथा तुमच्या पाठीवर त्याचा ताण निर्माण होईल. ज्यांना पाठीचे दुखणे आहे, त्यांनी डॉक्टर अथवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम करावा.

Enroll with this course now

शवासन

Nashik Engineers Gymkhana

शवासन


शव म्हणजे अर्थातच मृतदेह. आपल्या शरीराला मृतावस्थेसारखे करणे म्हणजेच शवासन. कृती- या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पायात पुरेसे अंतर ठेवावे. पायाचे पंजे बाहेर व टाच आत असायला हवी. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब असावेत. हात मोकळे ठेवावेत. मान सरळ व डोळे बंद हवेत. पूर्ण शरीर सैल सोडून द्या. त्यानंतर संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रीत करा. श्वास आत येणे व बाहेर जाण्याच्या प्रक्रियेवर नीट लक्ष द्या. श्वास आत येताना हळूवर थंडपणा जाणवतो, त्याचा अनुभव घ्या. त्याचवेळी श्वास बाहेर सोडताना हलका गरमपणा जाणवतो, तोही अनुभवा. यानंतर अनुक्रमे छाती व नाभीवर लक्ष केंद्रीत करा. मनात शंभरापासून एकपर्यंत उलट्या क्रमाने आकडे मोजा. आकडे मोजण्यात चुक झाल्यास शंभरापासून पुन्हा सुरू करा.
सूचना- या आसनात डोळे बंद हवेत. हात शरीरापासून सहा इंच दूर व पायात एक ते दीड फूट अंतर हवे. शरीर पूर्णपणे सैल सोडले पाहिजे. श्वास घेताना शरीर हलवू नका. आपले लक्ष पूर्णपणे शरीरावर हवे. मनातल्या विचारांवर नाही. त्यामुळे श्वास घेण्यातली सहजता अनुभवा.
फायदा- मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, निद्रानाश यावर हे आसन उपयुक्त आहे. या आसनात मन शरीराशी जोडले गेलेले असते. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. त्यामुळे मन विश्रांत अवस्थेत असते. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.

Enroll with this course now

Get your admission now!

Enroll